सातवा ऋतू
रोहिणी निनावे.
सुप्रसिद्ध लेखक आणि कवी श्री. वसंत निनावे यांच्या कन्या. कॉलेजजीवनापासूनच त्यांना लिखाणाची आवड निर्माण झाली. मराठी आणि हिंदी साहित्यात एम.ए. केल्यामुळे गद्य आणि पद्य या दोन्ही विधांमध्ये अभिरुची निर्माण झाली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि दिवाळी अंकांपासून त्यांच्या कवितालेखनाला सुरुवात झाली. नंतर अनेक मालिकांची शीर्षकगीतं त्यांनी लिहिली. संस्कार, घरकुल, कुंकू, अवघाचि संसार, मृण्मयी, अर्थ, पुढचं पाऊल, स्वप्नांच्या पलीकडले, ठिपक्यांची रांगोळी, फुलाला सुगंध मातीचा, मुरांबा, लग्नाची बेडी, तुझेच मी गीत गात आहे, अजूनही बरसात आहे इत्यादि... त्यांनी लिहिलेल्या अनेक मालिकांच्या शीर्षकगीतांना पुरस्कार मिळाले आहेत. याआधी त्यांचं ‘इंतजार’ नावाचं हिंदी कवितांचं पुस्तक प्रकाशित झालं असून, त्याला ज्येष्ठ कवी गुलजार यांची प्रस्तावना लाभली आहे.