काळाच्या ओघात अनेक पुस्तकं पडद्याआड जातात. ‘मेनका प्रकाशन’च्या ६५ वर्षांच्या वाटचालीतला, काळाच्या पडद्याआड गेलेला पण समृद्ध कथा-कादंबऱ्यांची रेलचेल असलेला हा साहित्यखजिना !
‘मेनका क्लासिक्स’ या मालिकेअंतर्गत आता मुद्रणबाह्य अर्थात ‘आऊट ऑफ प्रिंट’ पुस्तके पुनर्प्रकाशित करीत आहोत.
विशेष सूचना : ‘मेनका क्लासिक्स’ मालिकेतील पुस्तके स्कॅन करून पुनर्मुद्रित केली आहेत. या पुस्तकांची मूळ मुखपृष्ठे उपलब्ध नसल्याने नव्याने चितारलेली आहेत. मुखपृष्ठावर छापलेली किंमत ही अंतिम विक्रीमूल्य म्हणून गृहीत धरावी. आतील पानांवर छापलेली किंमत ही मूळ आवृत्तीची किंमत असून, ती ग्राह्य धरू नये. या उपक्रमाचा हेतू मुद्रणबाह्य साहित्यठेवा वाचकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. प्रथम प्रसिद्धीनंतर यांपैकी कोणतेही पुस्तक अन्य प्रकाशकामार्फत प्रसिद्ध केले गेले असल्यास कृपया ‘मेनका प्रकाशना’च्या निदर्शनास आणून द्यावे.