
शिवाजी सावंत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली 'छावा' कादंबरी गेली अनेक दशके मराठी वाचकांनी आपल्या हृदयाशी जपली होती. तिचं रुपांतरण असलेल्या चित्रपटाचं बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर दमदार आगमन झालं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला देशभर मानाचा मुजरा लाभला. या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांच्या आकाशतुल्य व्यक्तिमत्त्वाचं सार्थ दर्शन घडविणाऱ्या नव्या मुखपृष्ठासह 'छावा' कादंबरी विशेष रुपात अवतरत आहे. छावा चित्रपट मनात रुंजी घालत असताना ही खास आवृत्ती नक्कीच प्रत्येकाला आपल्या बुकशेल्फ मध्ये पाहायला आवडेल.
किंमत - रु. 625