१०१ ब्रेकफास्ट रेसिपीज
कांचन बापट
‘ब्रेकफास्ट’ ही काही पाश्चात्त्यांनी आपल्याला दिलेली देणगी नाही. तांबडं फुटल्यावर शेताकडे औतं धरायला जाण्यापूर्वी न्याहारी करणं, हा आपल्या प्राचीन संस्कृतीचा भाग होता आणि आज धावपळीच्या जीवनात घराबाहेर पडण्यापूर्वी पोटात काहीतरी ढकलणं, याला आपण ‘ब्रेकफास्ट’ म्हणतो. पण ‘ब्रेकफास्ट’ हा पोटात काहीतरी ढकलून उरकण्याचा प्रकार नक्कीच नाही.
दिवसभराच्या धावपळीसाठी लागणार्या ऊर्जेचा स्रोत म्हणजे ‘ब्रेकफास्ट’ आहे. शरीर-मन या दोघांचं भरण-पोषण आणि संतुलन राखण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ आणि व्यायामाला पर्याय नाही. प्रत्येकाला आपला ‘ब्रेकफास्ट’ स्वतः निवडता आला आणि सहजगत्या करता आला, तर दिवसाच्या सुरुवातीचे किती संघर्ष कमी होतील! हे संघर्ष टाळणं, हा या पुस्तकाचा हेतू नाही, पण संपन्न मनुष्यबळ ही प्रत्येक राष्ट्राची बहुमोल संपत्ती असते. असं हे समृद्ध मनुष्यबळ घडवण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ फार मोलाची भूमिका बजावतो. ‘१०१ ब्रेकफास्ट रेसिपीज’ या पुस्तकात तुम्हाला पानोपानी ‘अरेच्चा! हे तर किती सोप्पं आणि मस्त आहे!’ असं वाटल्याशिवाय राहणार नाही. ‘ब्रेकफास्ट’ची ही सेंच्युरी तुम्हालाही आयुष्याच्या शतकी खेळीसाठी साहाय्यभूत ठरेल.
A collection of 101 healthy breakfast recipes for entire family.