१०१ बेबी फूड रेसिपीज
कांचन बापट
पर्याय जेवढे अधिक उपलब्ध होतील, तेवढी निवड अधिक कठीण होते. आजच्या युगातल्या प्रत्येक आईची आपलं तान्हुलं पाच वर्षांचं होईपर्यंत त्याला नेमकं काय खायला द्यायचं, कधी, कसं द्यायचं, या बाबतीत हीच अवस्था आहे. कुणी म्हणतं, ‘हे द्या!’ कुणी सांगतं, ‘ते अजिबात नको!’ आईला आणि बाबालाही पार गांगरून जायला होतं. बरं, बाळाच्या खाण्याच्या बाबतीत प्रयोग करण्याचा धोका कसा पत्करणार? मूल दिवसागणिक वाढत असतं आणि त्याला त्याच्या त्या त्या टप्प्यावर लागणारा आहार नेमकेपणानं मिळणं म्हणजे त्याच्या भावी शारीरिक आणि मानसिक आयुष्याची पायाभरणी करणं असतं. सहा महिन्यांचं असताना जे खायचं असतं, त्यात वर्षाचं झाल्यावर बदल करावा लागतो. आणि पाच वर्षांपर्यंत त्याला चव, रस, गंध यानं परिपूर्ण असलेल्या पौष्टिक आहाराची सवय होणं खूप आवश्यक असतं. लहानग्यांसाठीच्या आहाराची गुरुकिल्ली म्हणजे हे पुस्तक!
101 Baby Food Recipes
A collection of 101 carefully drafted recipes for infants and toddles ageing from 6 months to 5 years.