आरोग्याच्या गुजगोष्टी
डॉ. मालती कारवारकर
तुमच्यातून तुमचा आहार डोकावतो
जिथे जीव आहे, तिथे अन्नाची गरज असते. पण हे अन्न उदरभरणासाठी नसावं, तर अशा अन्नामुळे शरीराची योग्य ती उभारणी व्हावी, हा हेतूही पुरा व्हावा अशी अपेक्षा असते. शास्त्रज्ञांनी प्रयोगांती असे अन्नपदार्थ निश्चित केले आणि त्यांच्या गुणधर्मानुसार एका विशिष्ट पद्धतीत मांडण्याचं कामही केलं.
या विशिष्ट पद्धतीला ‘डाएट’ असं म्हणतात. पण त्याचा शास्त्रीय अभ्यास न केल्यास त्यांतले पदार्थ कसेही, कधीही आणि कितीही खाल्ले जातात आणि इतरांनाही दिले जातात. असं करण्यामुळे आज ‘डाएट’च्या भुलभुलैय्याचे अनेक प्रकार प्रचारात आले आहेत.
असं होऊ नये, असं वाटत असल्यास या पुस्तकात ‘डाएट’चा एक शास्त्रशुद्ध आराखडा दिला आहे. त्यासोबत योग्य त्या टीका-टिप्पणीही देण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करावा आणि दैनंदिन वापरही करावा.
An eye-opener for all those who believe in dieting. Dr. Malati Karwarkar tries to converse with both - the new and old generation about the proper ways of consuming food and explains the true meaning of diet.