नोबेल विजेते साहित्यिक
- डॉ. भालचंद्र सुपेकर
‘नोबेल’च्या मानचिन्हावर आजवर शंभराहून अधिक साहित्यिकांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटवलाय. यातल्या प्रत्येकाचा साहित्यप्रकार, विषय, मांडणी, शैली वेगळी. कुठे जीवनानुभवातला अर्क, तर कुठे आंतरिक ऊर्मीतून स्फुरलेले शब्द, कुठे अभ्यासपूर्ण चिकित्सा, तर कुठे व्यासंगातून स्रवलेली कविता... या सगळ्यांनी माणसाचं जगणं अधिकाधिक समृद्ध केलंय. साहित्य आणि माणसाचं जीवन यांच्यातला निरलस अनुबंध उलगडण्याचा हा एक प्रयत्न.