दृष्टी (कथासंग्रह)
काही समस्यांना आपण मानवी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो, तर काही समस्यांची उत्तरं असतात नियतीच्या हातात. हे आपल्या मनाला जाणवण्यासाठी लागते वेधक दृष्टी आणि संवेदनशील मन. जे आर. बी. चाफळकर यांच्याकडे आहे. या कथासंग्रहातल्या कथा त्याचंच प्रतिबिंब आहे. माया, त्याग, घुसमट, आधार अशा असंख्य भावनांचा सहजसोप्या शैलीत वेध घेणारा हा कथासंग्रह... ‘दृष्टी’.
याबरोबरच सादर करत आहोत ‘गंधित’ हा कवितासंग्रह...
अभिव्यक्त होता येणं आणि संवाद साधता येणं, ही कला आहे. भावनांची जोड या दोन्हीला लाभली, तर त्याची कविता होते.आर. बी. चाफळकर सहज व्यक्त होत गेले आहेत आणि त्यातूनच ‘गंधित’ हा काव्यसंग्रह साकारला आहे.