A Short History of European Philosophy- By Deeoti Gangawane
कुठल्याही संस्कृतीच्या जडणघडणीत त्या संस्कृतीत रुजलेल्या विचारबीजांचा वाटा फार मोठा असतो. हे विचार धर्म, पुराणे, कला, विज्ञान अशा अनेक रुपांनी विकसित होत असले, तरी संस्कृतीच्या एकूण विचारधारेतील मूलभूत विचार तत्वज्ञानविषयक असतात. या तत्वविचारांचा दृश्य वा अदृश्य, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव जीवनाच्या सर्व अंगांवर अपरिहार्यपणे पडत असतो. तत्वज्ञानाचे योगदान केवळ सैद्धांतिक पातळीवरच नव्हे तर व्यावहारिक पातळीवरही अत्यंत लक्षणिय असते. एखाद्या संस्कृतीमधील तत्वविचारांच्या परंपरेचा मागोवा घेतल्याशिवाय त्या संस्कृतीबद्दलचे आपले आकलन अपुरेच राहते.
लेखिका - दीप्ती गंगावणे