प्रेरणेमधूनच आकांक्षा जन्माला येतात. माणसाला ज्या आकांक्षा असतात तिथपर्यंत तो पोचू शकतो, पण जर त्याला प्रेरणाच नसेल तर तो सुरुवातच करू शकणार नाही. मोदींचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास याहून वेगळा नाही. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या आणि त्यांना प्रेरणा देणाऱ्या गांधीजी, सरदार पटेल आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या थोर व्यक्तींची नावं ते पुष्कळदा आपल्या भाषणामध्ये घेत असतात. या साऱ्यांचा प्रभाव, मग तो आध्यात्मिक असो की सामाजिक-राजकीय, तो मोदींच्या कामामध्ये खोलवर रुजलेला आहे. इथं विशेषत्वानं नमूद केलेल्या या साधर्म्याखेरीज अन्य कोणती साधर्म्य मोदी आणि या थोर व्यक्तींमध्ये आढळतात. हे शोधणं वाचकासाठी रंजक ठरेल.
लेखक ः डॉ. राजेशकुमार आचार्य, गिरीशचंद्र तन्ना