१९९० च्या दशकात एका संपूर्ण रशियन पिढीने काय भोगलं, याचा लेखाजोखा मांडणाऱ्या या कथा. यातले कथानायक बहुतेक टिनएजर्स किंवा लहान मुलं आहेत. अपघात किंवा हादरा म्हणावा अशी घटना प्रत्येकाच्या आयु्ष्यात घडलेली आहे. ज्यांनी भरण पोषण करायचे, सांभाळायचे, त्या आईबापांनी त्यांना अक्षरशः टाकून दिले आहे. ही पिढी शोषित आहे पण बिचारी अजिबातच नाही. भविष्याच्या चिंतेने ती लाचार किंवा भयभीतही झालेली नाही. भीषण म्हणावे अशा परिस्थितीला ती एक प्रकारच्या मिजासीने तोंड देत आहे. दुर्दम्य आशावाद हे रशियन स्वभावाचे वैशिष्ट्य तिच्यात पुरेपूर उतरले आहे.
मुळ रशियन लेखक- आन्द्रेइ गेलासिमव । भाषांतर - अनघा भट
प्रकाशक - कलासक्त पुणे