आस्वाद
संकलन - सुमन बेहेरे
भारतीय समाजात जेवढी विविधता आहे, त्याहून खचितच जास्त वैविध्य आपल्या आहारात आहे. कुणी तिखटजाळ खाणार, तर कुणी गोडसर चवीचं खाणार. कुणी दणकून हाणणारा, तर कुणी मिताहारी. कुणाला कडक शाकाहारी पदार्थ भावणार, तर कुणाला मांसाहाराविना जेवणाची कल्पनाच करता येणार नाही. कुणाला चटकदार हवं, तर कुणाला सपक चव हवीशी वाटणार. हे सारं वैविध्य सामावून घेण्यासाठी लागते समृद्ध आहारसंस्कृती. भारतात आहारसंस्कृती चौफेर आहे. नवे फ्यूजन पदार्थ आत्मसात करताना आपल्याच भात्यातल्या अनेक चवदार पदार्थांची ओळख अंधुक होत चालली आहे. पानाला आणि जिभेला तडका देणार्या आठशेहून अधिक पाकक्रिया घेऊन ‘आस्वाद’ आपल्या सेवेत आलं आहे. ‘आस्वाद’मधल्या पाककृतींवरून केवळ नजर जरी फिरवली, तरी त्यांचा आस्वाद घ्यायची इच्छा होईल, हे नक्की!
A collection of 800+ traditional Indian recipes.