मोरपीस - 2
टाईम मशीनच्या माध्यमातून काळाच्या पुढेही जाता येतं आणि मागेही. ‘मोरपीस’ हे तरी खरं काय आहे? कोणत्या तरी पुस्तकात दडवून ठेवलेलं मोरपीस हरवतं, पण काळजात तर ते कायमच जागा करून असतं. ‘माहेर’च्या अंकांतून एकोणीसशे साठच्या दशकापासून अशी हजारो मोरपिसं ठायीठायी भेटतात. साहित्याची समृद्धी वाढवणार्या आणि वाचकांची संपन्नता वर्धिष्णू करणार्या अनमोल सर्वस्पर्शी कथांचा नजराणा म्हणजे ‘मोरपीस’!